प्रभाग १० मधून अमर माने यांनी निवडणूक लढवावी प्रभागातील नागरिकांची मागणी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

प्रभाग १० मधून सामाजिक भान असणारे,शांत,संयमी व उच्चशिक्षित अमर मारुती माने यांनी आगामी निवडणूक लढवावी,अशी जोरदार मागणी स्थानिक युवा वर्गासह नागरिकांकडून पुढे येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांनी नागरिक त्रस्त झाले असून, हे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम व सक्रिय नेतृत्वाची गरज असल्याची भावना मतदार व्यक्त करत आहेत.ही गरज पूर्ण करण्याची क्षमता अमर माने यांच्यात असल्याचा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.गेल्या तीन दशकांपासून प्रभाग १० मधील हद्दवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे.परिणामी अनेक नागरिकांना स्वतःच हक्क असलेलं घर मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.वेळोवेळी या प्रश्नावर राजकीय पातळीवर आश्वासने देण्यात आली,मात्र प्रत्यक्षात कोणतेही ठोस पाऊल उचलले न गेल्याने सर्वसामान्य मतदारामध्ये नाराजीचे वातावरण आहे.याशिवाय प्रभागातील घनकचरा डेपोमुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत.भटक्या कुत्र्यांचा त्रास, कचऱ्याचा दुर्गंध,डासांची वाढ यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.या समस्यांवर तातडीने उपाययोजना आवश्यक असल्याची गरज असून हा प्रश्न प्रभागात राहणाऱ्या उमेदवारच सोडवू शकतो त्यासाठी माने यांच्या उमेदवारीला पसंती मिळत आहे. २०१९ व २०२१ मधील महापुराच्या काळात प्रभागातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती.त्यावेळी राजकीय हेतू न ठेवता सर्वात प्रथम धावून येत जीवनावश्यक वस्तू,आरोग्य सहाय्य आणि इतर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम अमर माने यांनी हाती घेतले होते.यामुळे त्यांना नागरिकांच्या मनात विशेष स्थान प्राप्त झाले आहे. समाजकार्यास प्राधान्य आणि लोकांच्या प्रश्नांची जाण असल्याने त्यांच्या नेतृत्वावर प्रभागातील मतदारांचा विश्वास दृढ आहे.प्रभागातील समस्या समोर आणून त्यांचे सक्षम निराकरण करण्यासाठी अमर माने यांनी पुढाकार घ्यावा,तसेच त्यांनी निवडणूक रिंगणात उतरावे,अशी एकमुखी मागणी सध्या नागरिक आणि युवा वर्गातून होत आहे. प्रभाग १० मध्ये राहण्यास असणारे सक्षम,प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्वाच्या रूपाने अमर माने हे योग्य पर्याय ठरू शकतात असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!