माजी राष्ट्रपतीच्या आगमनाने कांही काळ स्तब्ध झाला सांगली फाटा , त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरील कसरत करावी लागली .
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
नेहमी गजबजलेला सांगली फाटा आज माजी राष्ट्रपतीच्या आगमनाने काही काळ स्तब्ध स्थितीत पहावयास मिळाला जिथल्या तिथे रस्त्यांवरील वहाने थांबवून पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले पण या कालावधीसाठी मात्र सर्वसामान्य जनतेला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला . वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरील कसरत करावी लागली .आज देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आतिग्रे येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथील कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते कार्यक्रम सकाळच्या सत्रात असल्याने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा ताफा उजळाईवाडी विमानतळावरून निघाला तो सांगली फाटा येथे १० वाजण्यासुमार पोचला नंतर परतीचा प्रवास दुपारी १:३० वाजता सांगली फाटा येथे पोहचला या दरम्यानच्या काळात पोलिसांनी रस्त्यांवरील सर्व वाहतूक जिथल्या तिथे थांबून आपले कर्तव्य पार पाडत माजी राष्ट्रपतीचा ताफा सुखकर करून दिला पण यात मात्र सर्वसामान्य जनतेला दोन्ही वेळेस आर्धा तास वेठीस धरून ठेवण्यात आले होते.जनतेतून एकच स्वर पुढे येत होता कि संजय घोडावत यांचे विमान , हेलिकॉप्टर सेवा सुरू असताना उजळाईवाडी विमानतळावरून त्याना हेलिकॉप्टरने कार्यक्रम स्थळी का नेले नाही नेले असते तर आम्हा जनतेला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला नसता आदि त्यात रस्त्याच्या कामांमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी जटिल होत चालली असता त्याच आज रस्त्याच्या कडेला अशा प्रकार ताटकळत उभे राहावे लागले .कोविंद यांच्या बायरोड दौऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात काहीवेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती कोविंद यांचा ताफा पुढे सरकताच वाहनधारक आडवी तिडवी येत आपली वाट पुढे काढत होती ती सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरील कसरत करावी करावी लागली .