महा ई-सेवा केंद्र चालकास इचलकरंजी प्रांताधिकारी दिपक शिंदे यांचा दिला सज्जड

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

कुणबी समाजाचा दाखला काढून देण्यासाठी जादा पैशाची मागणी करणाऱ्या पेठवडगाव येथील महा ई-सेवा केंद्र चालकास इचलकरंजी प्रांताधिकारी दिपक शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सज्जड दम दिला आहे . तर नियम डावलून कोणी जादा पैशाची मागणी केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे .

 

सध्या महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाल्याने तसेच अनेक ठिकाणी आरक्षण पडले आहे. ओबीसी आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी कुणबी दाखला ( समाजेचे प्रमाणपत्र ) काढण्यात इच्छुक उमेदवार गुंतले आहेत हे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी महा ई-सेवा केंद्र चालक नियमबाह्य जादा पैशाची मागणी करत असल्याची तक्रारी इचलकरंजी प्रांताधिकारी दिपक शिंदे यांच्याकडे वारंवार येत होत्या अशा तक्रारीच्या अनुषंगाने इचलकरंजी उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी पेठवडगाव परिसरातील महा ई-सेवा केंद्रांवर तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत काही केंद्रचालक नागरिकांकडून जादा पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले असता अशा केंद्र चालकांना सज्जड दम भरला. असे प्रकार यापुढे केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे सुनावले.

 

तालुक्यात अनेक महा ई-सेवा केंद्र असून त्यानी नियमबाह्य होऊन नागरिकांकडून जादा रक्कमेची मागणी करू नये व कोणी करत असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही सांगितले मोहिमेमुळे परिसरातील इतर सेवा केंद्रांनाही इशारा मिळाला असून नागरिकांनी ही शासनाच्या अधिकृत दराप्रमाणेच शुल्क भरण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!