शिरोली हायस्कूलचा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक..!

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

 

रत्नागिरी डेरवण येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेत शिरोली हायस्कूल, शिरोली पुलाची या कोल्हापूर विभागीय संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.या संघाने उपांत्य पूर्व सामन्यात छ.संभाजीनगर विभागीय संघाचा ६३-२१ ने पराभव करून उपांत्य सामन्यात प्रवेश केला. उपांत्य सामन्यात अमरावती विभागीय संघाचा ६३-५१ अशा फरकाने विजय मिळवत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. अंतिम सामन्यात लातूर विभागीय संघाचा ७४-४५ गुणांनी पराभव करून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.विजयी संघास संस्थेचे चेअरमन सुरेश पाटील,अध्यक्ष सलीम देसाई, सेक्रेटरी कृष्णात खवरे, संचालक श्रीकांत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एम.एस. स्वामी, पर्यवेक्षिका एस.एस.गाडेकर, जिमखाना प्रमुख आर.एस.पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. प्रशिक्षक नामदेव गावडे, संभाजी गावडे, सचिन कोळी, नितीन पदमाई ,आर.एम.मारापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

error: Content is protected !!