राजकीय घडामोडीनंतर श्वेता विश्वास काळे यांची उमेदवारी चर्चेत – दादा काळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष 

Spread the love

 शरोळ / प्रतिनिधी

शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीला राजकीय रंगत येत असून नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.दोन दिवसांपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर श्वेता विश्वास काळे उमेदवार म्हणून विशेष चर्चेत आल्या आहेत.श्वेता काळे या विश्वास उर्फ दादा काळे यांच्या पत्नी असून, दादा काळे यांनी गेल्या काही वर्षांत विविध लोकहिताच्या प्रश्नांवर आंदोलने,उपोषणे व जनआंदोलनांच्या माध्यमातून प्रशासनाला जेरीस आणत सामान्य नागरिकांचा आवाज बुलंद केला होता.त्यांच्या या लढाऊ भूमिकेचा वारसा आता श्वेता काळे पुढे नेण्यास इच्छुक आहेत.श्वेता काळे यांनी शिरोळ नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून,त्यांच्या उमेदवारीबाबत शिरोळच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. तथापि, त्यांच्या उमेदवारीसंदर्भात प्रमुख नेत्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत असून,श्वेता काळे यांना संधी दिली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.विश्वास काळे यांनी आपल्या चळवळीद्वारे सामान्य नागरिक,शेतकरी, कामगार व वंचित घटकांसाठी अनेक आंदोलनं करून त्यांचा विश्वास संपादन केला होता.त्यांच्या कार्याची दखल घेत शिरोळकर नागरिक श्वेता काळे यांच्याकडे अपेक्षेने पाहत आहे.दरम्यान, श्वेता काळे कोणत्या आघाडीतून उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.आगामी काही दिवसांत शिरोळ नगरपरिषदेची निवडणूक अधिकच रंगतदार होणार असून,श्वेता काळे यांच्या उमेदवारीने या निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांना चालना मिळेल,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!