प्रभाग ५ मधून उच्चशिक्षित आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या सौ.अस्मिता माळी यांना उमेदवारी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ शहरातील प्रभाग क्र. ५ मधून सर्वसामान्य कुटुंबातील सौ.अस्मिता आशुतोष माळी यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी मतदारांमध्ये होती. सामाजिक भान असलेल्या आणि लोकसहभागातून विकासाचा मार्ग शोधण्याची तयारी असलेल्या स्मिता माळी यांच्या उमेदवारीची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.सौ.अस्मिता माळी या ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांच्या स्नुषा असून बाळासाहेब माळी यांनी गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.त्यांच्या या कार्याचा ठसा शहरवासीयांच्या मनावर असून,त्याच परंपरेतून समाजकारणाची प्रेरणा घेऊन सौ.अस्मिता माळी पुढे येत आहेत.शिक्षणाने उच्चशिक्षित आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या अस्मिता माळी यांनी विविध सामाजिक उपक्रमांत सक्रीय सहभाग नोंदविला आहे.महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच प्रबोधनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत.दरम्यान,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी कडून प्रभाग ५ मधून सौ.अस्मिता माळी यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.या घोषणेनंतर प्रभागातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “प्रभाग पाचच्या विकासासाठी नव्या विचारांची गरज होती,ती अस्मिता माळी पूर्ण करतील, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.गेल्या पाच वर्षात प्रभाग पाचमधील स्थानिक समस्या पाणीपुरवठा,स्वच्छता,रस्त्यांची विकास कामे पूर्ण केली आहेत.प्रभागात सांस्कृतिक हॉल बांधणे व महिलांसाठी उपयुक्त सुविधा प्रलंबित काम करण्याची तयारी सौ.अस्मिता माळी यांनी दाखवली आहे.त्यांच्या सौम्य स्वभाव आणि संवादक्षमतेमुळे सर्वसामान्य नागरिकात प्रभाव आहे.त्यामुळं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अस्मिता माळी यांची उमेदवारी राजर्षी शाहू विकास आघाडीला नवे बळ देईल,असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.प्रभाग पाचमध्ये या उमेदवारीमुळे नव्या राजकीय समीकरणांचीही चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!