संचित बंडगर याचा श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार 

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी 

नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संचित बंडगर याची गोवा येथे होणाऱ्या मॉडर्न पेंटाथलॉन या खेळ प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.याच अनुषंगाने संचित बंडगर याचा श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत शिकत असणारा विद्यार्थी संचित बंडगर यांने अहिल्यानगर येथे झालेल्या १७ वर्षाखालील मॉडर्न पेंटाथलॉन या खेळ प्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला.तर गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. याच अनुषंगाने श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार आयोजित करण्यात आला होता.महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.महाविद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकत आहे हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून यापुढे असेच खेळाडू घडावेत या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. अनेक सोयी व सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत यावेळी संचित बंडगर यांचे अभिनंदन करण्यात आले.सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या चांगल्या खेळाडूंसाठी उत्तम प्लॅटफॉर्म देत असल्याने परिसरातून आमच्या महाविद्यालयाकडे प्रवेशासाठी जास्त कल आहे.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य,क्रीडाशिक्षक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!