कुरुंदवाड ता.शिरोळ येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संचित बंडगर याची गोवा येथे होणाऱ्या मॉडर्न पेंटाथलॉन या खेळ प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.संचित बंडगर याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत शिकत असणारा विद्यार्थी संचित बंडगर यांने अहिल्यानगर येथे झालेल्या १७ वर्षाखालील मॉडर्न पेंटाथलॉन या खेळ प्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला.तर गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. संचित याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयातून अनेक खेळ प्रकारांमध्ये खेळाडूंची घोडदौड सुरूच असून खेळ प्रकारात महाविद्यालयाचा चढता आलेख दिसून येत आहे. महाविद्यालयातून खेळाडूसाठी सर्व सोयी व सुविधा पुरवून प्रोत्साहन देण्यात येते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या चांगल्या खेळाडूंसाठी अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म या शैक्षणिक संस्थेतून मिळत असल्याने परिसरातून या महाविद्यालयाला कायमच पसंती दिसून येते. या खेळाडूस शालेय समितीचे अध्यक्ष,सदस्य ,महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील,क्रीडाशिक्षक एस.एस गडदे ,महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.