सौ संगीता,काळजी करू नको, आम्ही पाठीशी शिरोळ येथे जेष्ठ मतदारांच्या प्रतिक्रिया

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

दोन डिसेंबरला होणाऱ्या शिरोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या शिरोळ तालुका माजी उपाध्यक्ष सौ संगीता दगडू माने यांनी घरोघरी मतदारांच्या भेटी घेवून प्रचारात मुसंडी मारली आहे. शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत लोकाग्रहास्तव नगराध्यक्षपदासाठी सौ संगीता दगडू माने यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.शिरोळ शहरातील सर्वच प्रभागात संपर्क दौरा सुरू करून त्यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पहिल्या फेरीतील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे.शिरोळ नगरपालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिरोळ नगरपालिकेची धामधूम सुरू झाली आहे. लवकरच निवडणूका होणार आहेत. अनुसूचित जाती महिला करिता नगराध्यक्ष पद आरक्षित झाल्याने या पदावर शिरोळ तालुका महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा व दुर्गामाता महिला मंडळाच्या संस्थापिका सौ संगीता दगडू माने यांना संधी मिळावी यासाठी विशेषतः महिला मतदारांचा आग्रह वाढला आहे. अनेक युवा मतदारांनी प्रत्यक्ष भेटून सौ संगीता दगडू माने यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. दरम्यान , माने परिवाराने बैठका घेऊन जनतेच्या लोकाग्रहास्तव शिरोळ नगरपरिषदेची निवडणूक मैदानात उतरल्या असून गेल्या ९ दिवसापासून भावी नगराध्यक्षा सौ संगीता माने व त्यांच्या समर्थकांनी शिरोळ प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार गतिमान केला आहे.
मी शहराचा विकास करण्यासाठी वचनबद्ध राहणार असून मला आपण आशीर्वाद आणि साथ द्यावी ! असे भावनिक आवाहन भावी नगराध्यक्ष सौ संगीता माने यांनी केले आहे.
येथील संगमनगर ,संत रोहिदास नगर, राजीव गांधी (नंदीवाले वसाहत) नगर इंदिरानगर , लक्ष्मी नगर , समता नगर , संभाजीनगर , दत्तनगर यासह गावभाग परिसरातील प्रभागात थेट मतदारांच्या गाठीभेटी घेऊन नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आशीर्वाद द्या अशी भावनिक साद घालत आहेत.या प्रचार दौऱ्यात महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉ दगडू माने (पत्रकार ) , सुभाष माने, शंकर माने, रावसाहेब भोसले, सचिन कमलाकर ,पुनम माने, अनुश्री माने, लता मराठे, लता जाधव, आशुतोष माने, सुशीला माने ,जीवन आवळे, रेखा माने, प्रमोद कांबळे – राणे , जगदीश पाटील ,नायकू माने, रेखा माने, संजय माने, राहुल जाधव, निलाबाई हेगडे , वैभव माने यांच्यासह महिला व युवक कार्यकर्ते प्रचारात सक्रिय सहभागी झाले आहेत. दरम्यान ,सौ संगीता माने यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवावी यासाठी शिरोळ शहरातील महिला तसेच विविध संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा व्यक्त केला असून या लढ्याला अनेकाकडून बळ मिळत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!