“अखेर ठरलं” शिरोळ नगरपरिषद प्रभाग क्रमांक ५ मधून मुकुंद गावडे निवडणूक रिंगणात

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमधून भाजपा पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी मुकुंद गावडे हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.गावडे यांच्या उमेदवारीची चर्चा सध्या प्रभागात जोरदार रंगली असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुकुंद गावडे यांनी यापूर्वी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक तीनमधून सदस्य म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे.त्यामुळे स्थानिक प्रशासनातील कामकाजाचा त्यांना भक्कम अनुभव आहे.त्यांच्या कार्यकाळात अनेक मूलभूत सुविधांची उभारणी झाली असून नागरिकांच्या अडचणी तातडीने मार्गी लावण्यात त्यांनी सातत्य दाखवले आहे.गावडे यांनी सदैव विकासाला प्राधान्य देत लोकसंपर्क आणि समन्वय यावर भर दिला आहे. सध्या ते भाजप कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत,तसेच त्यांनी शिरोळ तालुका भाजपा अध्यक्ष म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.पक्ष संघटन बळकट करण्याबरोबरच युवकांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्याचे कार्य त्यांनी केले आहे.त्यांच्या संघटनशक्तीमुळे आणि वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळे प्रभागातील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल,असा नागरिकांचा विश्वास आहे.प्रभाग पाचमध्ये रस्ते,पाणीपुरवठा,जलनिकासी, आरोग्य आणि स्वच्छता या मूलभूत गरजांबरोबरच सामाजिक उपक्रमांनाही गावडे प्राधान्य देणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. गावडे यांचा स्नेही स्वभाव,जनसंपर्क आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेले संवाद हे त्यांचे मोठे बळ मानले जात आहे.निवडणूक रिंगणात उतरल्याने मुकुंद गावडे यांच्या प्रचाराला जोर येत असून नागरिकांमध्ये “प्रभागाचा विकासमुखी चेहरा” म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ होत आहे.अनेक स्थानिक नागरिकांनी त्यांच्या उमेदवारीला खुला पाठिंबा दर्शविला असून आगामी निवडणुकीत प्रभाग पाचमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!