विजेच्या धक्क्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू , पतंग काढण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी अपघात; परिसरात शोककळा

Spread the love

उचगाव / प्रतिनिधी 

 

उचगाव येथे बुधवारी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत १५ वर्षीय सार्थक निलेश वळकुंजे या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.पतंग काढण्याच्या प्रयत्नात झालेल्या या दुर्दैवी अपघातामुळे गावात शोककळा पसरली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,मंगेश्वर देवालयाच्या मागे सार्थकचा पतंग विद्युत वाहिनीमध्ये अडकला होता.पतंग काढण्यासाठी त्याने लोखंडी तारा वापरल्याने ती थेट उच्चदाबाच्या विद्युत तारेस लागली.क्षणातच प्रचंड विजेचा धक्का बसल्याने सार्थकचा जागीच मृत्यू झाला.या घटनेच्या वेळी त्याचा लहान भाऊ विनायक वळकुंजे देखील उपस्थित होता.मात्र सुदैवाने तो बचावला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वीजपुरवठा बंद करण्याची सूचना केली.तत्परतेने उंचगाव परिसरातील वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिस ठाण्याचे तसेच सी.पी.आर.पोलिस चौकीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.द रम्यान, सार्थकच्या निधनाने वळकुंजे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.रात्री उशिरा त्याचे अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात पार पडले. शाळेत हुशार आणि उत्साही असलेल्या सार्थकच्या निधनाने मित्रपरिवार व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेनंतर गावात सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून,नागरिकांनी आपल्या मुलांना पतंग खेळताना विद्युत तारेपासून दूर ठेवावे,असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.सुरक्षिततेसंबंधी जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचेही मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

Leave a Comment

error: Content is protected !!