सुख- दुःखात सहभागी असणाऱ्या रविंद्र पाटील यांना प्रभाग 6 मधून उमेदवारी द्यावी, मतदारांची मागणी

Spread the love

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ नगरपरिषद निवडणुकीची तयारी वेग घेऊ लागली असून विविध प्रभागांमध्ये संभाव्य उमेदवारांची चर्चा रंगू लागली आहे. प्रभाग क्रमांक 6 मधून सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जनार्दन पाटील यांना उमेदवारी मिळावी,अशी जोरदार मागणी स्थानिक मतदारांमधून पुढे येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारण,सहकार आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करणारे रवींद्र पाटील हे जनसंपर्काच्या बळावर प्रभागातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व मानले जातात.कै.आण्णासो पाटील सहकारी दूध संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कामगार, तसेच सर्वसामान्य नागरिकांशी घट्ट संबंध प्रस्थापित केले आहेत.दुध संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला असून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यात ते नेहमी पुढाकार घेत आले आहेत.राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक सुख- दुःखात सहभागी होणारा आणि नेहमी संपर्कात असणारा हक्काचा माणूस म्हणून रवींद्र पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळे रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील विकासकामांना गती मिळेल असा विश्वास प्रभाग 6 मधील नागरिकांना आहे.रस्ते,पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे त्यांनी नेहमी प्राधान्याने लक्ष दिले आहे. स्थानिक तरुण वर्ग, दूध उत्पादक शेतकरी,महिला बचत गट, आणि सामाजिक संस्थांमधूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.दरम्यान,नगरपरिषद निवडणुकीसाठी पक्ष पातळीवर चर्चा सुरू असून,प्रभाग 6 मधून रवींद्र जनार्दन पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आता अधिक जोमाने केली जात आहे.या मागणीमुळे शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत या प्रभागातील राजकीय समीकरणांना वेगळी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!