शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार : सौ संगीता दगडू माने

Spread the love

मतदारांच्या गाठीभेटी घेत सौ संगीता दगडू माने यांचा संपर्क दौरा सुरू ; जनतेतून उस्फुर्त प्रतिसाद

शिरोळ / प्रतिनिधी

 

येथील सामाजिक कार्यकर्त्या व शिरोळ तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ संगिता दगडू माने यांनी शिरोळ नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. स्थानिक व तालुका पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेवून त्यांनी प्रचार दौरा सुरू केला आहे. दरम्यान, शिरोळ नगरपालिका नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असल्याने शिक्षित व कर्तबगार महिला म्हणून सौ संगीता माने यांना संधी देण्यात यावी अशी मागणी होत असून त्यांना मतदारांतून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे.शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ दगडू माने यांच्या पत्नी संगीता माने यांनी सामाजिक कार्याबरोबरच महिला संघटन, माजी विशेष कार्यकारी अधिकारी, शिरोळ तालुका महिला काँग्रेस पक्षाच्या माजी तालुका उपाध्यक्षा म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. दुर्गामाता महिला मंडळ व बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे उत्कृष्ठ संघटन करून महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांचे २२ वर्ष सामाजिक कार्यात योगदान असून त्यांना लोकसेवेची आवड आहे. सौ संगीता दगडू माने व माने परिवाराचा थेट जनतेशी सुसंवाद असून प्रत्येकाच्या सुखा – दुःखात सहभागी होऊन प्रामाणिक व विश्वासाने या परिवाराने जनतेशी ऋणानुबंध जोडले आहेत. शिरोळ नगरपालिका नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलांसाठी प्रथमच आरक्षित झाल्याने शिरोळ नगराध्यक्षा पदावर सौ संगीता दगडू माने यांना संधी मिळावी यासाठी जनतेतूनच वाढता पाठिंबा आहे. सौ संगीता दगडू माने व त्यांच्या समर्थक प्रचारादरम्यान शिरोळ शहरातील जनतेच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेताना दिसत आहेत. सौ संगीता माने यांना आदर्श महिला, आदर्श वहिनीसाहेब व आदर्श सामाजिक कार्यकर्त्या असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी दुर्गामाता महिला मंडळ स्थापन केले असून महिला उद्योग निर्मितीसाठी प्रेरणा दिली आहे. त्याशिवाय छोटे – मोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेवून त्यांनी सामाजिक ऐक्य , कौटुंबिक नाती दृढ करण्याबरोबरच आपल्या परीने समाजाप्रती मदत करण्याचा सेवाभाव जपला आहे. सौ माने यांनी वृद्धाश्रम व सामाजिक सेवाभावी संस्थाच्या सहल भेटीतून समाजातील दुःख निवारणासाठी चांगुलपणाची वैचारिक साखर पेरणी समाजात रुजावी यासाठी त्यांची धडपड सुरू असते. प्रथमच अनुसूचित जाती महिलासाठी शिरोळ नगराध्यक्ष पद आरक्षित असल्याने सर्वसामान्य व कर्तबगार महिला म्हणून सौ संगीता दगडू माने यांना नगराध्यक्षपदी संधी मिळावी अशी मागणी शिरोळकर जनतेतून होत आहे. त्यांचे सासरे उपसरपंच कै श्रीपती माने यांनी १९६९ मध्ये आमरण उपोषण लोकलढ्यात सहभागी होऊन शिरोळ गावाला पहिली नळ पाणी योजना मंजूर करून गावाला पिण्याचे पाणी दिले. दीनदौलत सोसायटीचे उपसभापती यासह विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कृषी व सामाजिक क्षेत्रात कार्य केले आहे . त्यांनी मागासवर्गीय व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कृष्णामाई सह पाणी योजना सुरू करून शेतकऱ्यांची शेती हिरवीगार केली आहे . सभासदांनी संस्थेला कै श्रीपती माने कृष्णामाई पाणी पुरवठा संस्था असे नामकरण केले आहे.सौ संगीता माने यांचे पती डॉ दगडू माने यांनी तीन दशकाहून अधिक काळ सामाजिक , सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असून कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून आचार्य प्र के अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे.महाराष्ट्र शासनाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण /दलितमित्र पुरस्काराने डॉ दगडू माने यांच्या कार्याचा गौरव झाला असून माने परिवाराला सामाजिक कार्याचा वारसा आहे. समाजाविषयी प्रचंड तळमळ असल्याने शिरोळ नगराध्यक्ष पदावर त्यांना संधी मिळावी अशी मागणी जनतेतून जोर धरत नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!