शिरोळ / प्रतिनिधी
सामाजिक कार्य म्हणजे केवळ फोटो काढणे, भाषणं ठोकणे किंवा प्रसिद्धीच्या झोतात राहणे नव्हे, तर समाजासाठी स्वतःचा वेळ, श्रम आणि मनापासूनची भावना अर्पण करणे हेच खरे सामाजिक कार्य होय.अशा निस्वार्थ समाजसेवेचं जिवंत उदाहरण म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निष्ठावान सदस्य आणि समाजसेवक सचिन सूर्यवंशी.शिरोळ शहरातील कोणत्याही सामाजिक,सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सचिन सूर्यवंशींची उपस्थिती असत. कोणाचा वाढदिवस असो,कोणाला पुरस्कार मिळालेला असो किंवा सन्मानाचा प्रसंग असो – कार्यक्रमात सचिन सूर्यवंशी हजर राहून शुभेच्छा देतात आणि झाडाचं रोप देऊन पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देतात. त्यांचा एकच ध्यास “माझ्यामुळे कोणाचं तरी भलं झालं पाहिजे.”श्री स्वामी समर्थ यांच्यावरील अढळ श्रद्धेतून त्यांना समाजकार्यासाठीची प्रेरणा आणि ताकद मिळते. दरवर्षी त्यांच्या घरी श्री स्वामी समर्थ जन्मकाळ मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.महाअभिषेक,पारायण आणि महाप्रसादाच्या माध्यमातून गावातील सर्व भक्तांना एकत्र आणण्याचं काम सूर्यवंशी कुटुंब सातत्याने करतं.या सर्व कार्यात सचिन सूर्यवंशी यांना त्यांच्या पत्नी सौ.सविता सूर्यवंशी यांचा कायमच मोलाचा हातभार लाभला आहे. औद्योगिक वसाहतीत तीन चाकी रिक्षा चालवून स्वतःचा उदरनिर्वाह करतानाच समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द दोघांनी मनात बाळगली आहे.त्यांच्या या सातत्यपूर्ण समाजसेवेची दखल घेत आता शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून सौ.सविता सूर्यवंशी यांना उमेदवारी द्यावी,अशी मागणी स्थानिक महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.समाजातील सर्व घटकांशी आत्मीयतेने वागणाऱ्या सूर्यवंशी दांपत्याबद्दल नागरिकांमध्ये विशेष आदरभाव असून,“अशा सेवाभावी व्यक्तींनीच प्रभागाच नेतृत्व करावं”अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.