कारखान्यांनी एकरकमी एफआरपी द्यावी : सदाभाऊ खोत
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात नुकत्याच झालेल्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर ऊस दराच्या मुद्द्यावर चर्चा रंगली आहे. या परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रति टन ऊसाला ३७५१ रुपये दर देण्याची मागणी केली होती, हेरवाड येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेले विधान परिषदेचे आमदार शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना या ऊस दरासंदर्भात प्रतिक्रिया विचारले असतात ते म्हणाले, राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे अत्यावश्यक आहे. अनेक कारखाने दोन ते तीन हप्त्यांमध्ये पैसे देतात, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो असे त्यांना वाटते, पण प्रत्यक्षात तसे नाही. शेतकऱ्यांना वर्षभराचे नियोजन करता यावे म्हणून त्यांना संपूर्ण एफआरपी एकाच वेळी मिळणे गरजेचे आहे.आमदार खोत यांनी पुढे सांगितले की, साखर व बाय-प्रॉडक्टचे दर सध्या वाढले आहेत, त्यामुळे कारखाना बंद होण्याच्या आतच दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.ऊस दराविषयी बोलताना त्यांनी सांगितले, वेगवेगळ्या संघटना विविध मागण्या आहेत, शेतकऱ्यांच्या हिताची जी मागणी असेल, त्या प्रत्येक मागणीला माझा ठाम पाठिंबा राहील, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.