दीपावलीनिमित्त मतदारांशी संवाद साधत डॉ.अरविंद माने व सौ.सारिका माने यांचा जनसंपर्क दौरा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शिरोळ नगरपंचायतीचे माजी नगरसेवक डॉ.अरविंद माने व त्यांच्या सौभाग्यवती सौ.सारिका अरविंद माने हे दीपावलीनिमित्त मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी घरोघरी भेटी देत असून,यावेळी नागरिकांचे आशीर्वाद घेत आहेत.शिरोळ नगराध्यक्ष पदाच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने सौ.सारिका माने यांना अधिकृत उमेदवारी दिली असून, त्यांची तयारी सध्या जोमात सुरू आहे.आमदार दलित मित्र डॉ.अशोकराव माने व माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.रेखा देवी माने यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा डॉ माने दापत्य पुढे नेत आहेत. गत पंचवार्षिक निवडणुकीत डॉ.अरविंद माने यांनीही अपक्ष म्हणून निवडणुकीत विजयी होत आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे. शिरोळ नगराध्यक्ष पद अनुसूचीत जाती महिला साठी आरक्षित झाल्याने सौ.सारिका माने या नगराध्यक्ष पदासाठी अत्यंत प्रबळ दावेदार मानल्या जात असून,सध्या त्या मतदारांच्या भेटी घेत आपली भूमिका प्रभावीपणे मांडत आहेत.दीपावलीच्या निमित्ताने माने दांपत्याने घरोघरी जाऊन शुभेच्छा देण्याचा उपक्रम राबवला आहे. या दौऱ्यात त्यांनी शिरोळच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेल्या विकास आराखड्याची माहिती नागरिकांना दिली.नगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या व प्रस्तावित विकासकामांविषयी सविस्तर चर्चा करत,भविष्यातील योजना देखील मांडण्यात आल्या.डॉ.माने व सौ.सारिका माने यांचे सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य व इतर विविध क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य असून, त्यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद ही त्याच्या कार्याची पोचपावती आहे. दीपावलीच्या या उपक्रमास नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माने दांपत्याचा हा जनसंपर्क दौरा लक्षवेधी ठरत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!