हातकणंगले मतदारसंघासाठी पाच कोटींचा विकासनिधी मंजूर – आ.डॉ.अशोकराव माने यांची माहिती

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी

 

हातकणंगले विधानसभा मतदारसंघासाठी मोठी विकासात्मक भर घालणारा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून,महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.हा निधी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील वडगाव, हुपरी नगरपरिषद आणि हातकणंगले नगरपंचायत या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी वापरण्यात येणार आहे.या निर्णयामुळे या भागातील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार असून नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे.

 

हातकणंगले नगरपंचायत क्षेत्रात

स्ते दुरुस्ती, विद्युत व्यवस्था सुधारणा आणि जलशुद्धीकरण संबंधित कामांसाठी १ रुपये कोटी निधी मंजूर झाला आहे.

 

हुपरी नगरपरिषद क्षेत्रात

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प,रस्ते व गटारी बांधकाम तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक गावभागातील अश्वारूढ मूर्ती परिसराचे सुशोभीकरण या कामांसाठी २ रुपये कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

वडगाव नगरपरिषद क्षेत्रात

रस्ते, गटारी, ज्योतिर्लिंग मंदिराचा विकास, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि ऊर्जा कार्यक्षम पथदिवे लावणे अशा विविध कामांसाठी २ रुपये कोटी निधी मंजूर झाला आहे.

 

या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार डॉ.अशोकराव माने म्हणाले, “हा निधी मिळवण्यासाठी शासनस्तरावर मी सातत्याने पाठपुरावा केला.या कार्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार आणि आमदार विनयराव कोरे सावकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.हातकणंगले मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.भविष्यातही अधिकाधिक योजना आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे,”असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले.

Leave a Comment

error: Content is protected !!