शिरोळ येथून 33 वर्षीय युवक बेपत्ता, नातेवाईकांकडे व परिसरात सर्वत्र शोध सुरू 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

 

शिरोळ येथील छत्रपती शिवाजी शाळेजवळ राहणारा 33 वर्षीय अविनाश मोहन बागडी हा दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता अचानक बेपत्ता झाला आहे.या संदर्भात त्याच्या वडिलांनी शिरोळ पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरु आहे.बेपत्ता युवकाचे नाव अविनाश मोहन बागडी असून तो सडपातळ बांध्याचा, उंची पाच फूट पाच इंच, रंगाने सावळा असून केस काळे आहेत. तो मराठी भाषा बोलतो. बेपत्ता होताना त्याने अंगात जांबळ्या रंगाचा पट्टे असलेला टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. विशेष म्हणजे, वडिलांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अविनाश वेडसर स्वभावाचा असून यापूर्वीही तो मानसिक अस्थिरतेमुळे घराबाहेर पडल्याची शक्यता आहे.मात्र यावेळी तो बराच वेळ झाला तरीही घरी परतलेला नाही, ही बाब चिंताजनक आहे. अविनाशच्या वडिलांनी, मोहन गंगाराम बागडी (वय 58, व्यवसाय – मजुरी) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलाने अचानक घर सोडले असून, त्यांनी नातेवाईकांकडे व परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही सापडलेला नाही. त्यामुळे त्यांनी शेवटी पोलीसांची मदत घेतली.या प्रकरणाचा तपास पोहेकॉ 607 काळे हे करत असून, तरी ,वरील वर्णनाची व्यक्ती कोठेही आढळून मोहन बागडी 9850391014,मिरासो बागडी 9834609084, मारुती बागडी 9960121097 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!