हातकणंगले नगरपंचायत आरक्षण सोडतीत  ‘कही खुशी, कही गम’

Spread the love

हातकणंगले / सुकुमार अब्दागिरे

हातकणंगले नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठी प्रभाग आरक्षण सोडत आज हातकणंगले तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. ही आरक्षण प्रक्रिया उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी मुख्याधिकारी विशाल पाटील, नगरपंचायतीचे सर्व अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आरक्षण प्रक्रिया पार पडली.हातकणंगले नगरपंचायतमधील एकूण १७ प्रभागांपैकी तीन जागा अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून त्यापैकी दोन महिला प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आल्या. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी पाच जागा राखीव ठेवण्यात आल्या असून त्यातील तीन जागा महिलांसाठी आहेत. उर्वरित नऊ प्रभागांपैकी चार जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव तर पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाल्या.आरक्षणाच्या चिठ्ठ्या उचलण्याची जबाबदारी लहान मुलांकडे देण्यात आली होती.अव्दिका अभिजीत कांबळे,आयान वासिम झाजे आणि हर्षदा निवास पाटील या मुलांनी चिठ्ठ्या उचलल्या.या प्रक्रियेत अनेक प्रभागांमध्ये आरक्षण बदलल्याने काही दिग्गज राजकीय नेत्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रभाग मिळाले नाहीत. त्यामुळे सभागृहात ‘कही खुशी, कही गम’ असे वातावरण निर्माण झाले होते.काहींसाठी हा बदल संधी ठरला, तर काहींसाठी नवे आव्हान.
मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी आरक्षण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे व यशस्वीरित्या पार पाडली. संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे
अनुसूचित जाती महिला प्रभाग. 1,13,
अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रभाग 9,
नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 5
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग 1,2,12,
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण प्रभाग 3,14
नागरिकांचा सर्वसाधारण प्रवर्ग एकूण प्रभाग 9
नागरिकांचा सर्वसाधारण प्रवर्ग महिला प्रभाग  8,11,15,16.
नागरिकांचा सर्वसाधारण प्रभाग 4,5,6,7,10.

Leave a Comment

error: Content is protected !!