पुलाची शिरोली/ प्रतिनिधी : कुबेर हंकारे
मौजे वडगांव ता हातकणंगले येथील भाजपचे माजी तालुका सरचिटणीस भूपाल शंकर कांबळे (वय ४८) यांनी गावाशेजारी असणाऱ्या हेरले गावच्या हद्दीत गळफास लावून घेवून आत्महत्या केली ही आत्महत्या त्यानी खासगी सावकार व एका संस्थेच्या त्रासातून केली असल्याची गावात चर्चा सुरू आहे . आत्महत्या करतेवेळी पत्नीस मुलांची काळजी घे असा मेसेज केला .पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कि भूपाल कांबळे हे सोमवारी पहाटे सुमारे ३.३० वाजता घरातून बाहेर पडले. ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला पण ते सापडे नाही म्हणून कुटुंबीयानी शिरोली पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यास गेले पण हद्दीचा विषय समोर आल्याने त्यानी तक्रार घेतली नाही त्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता ते मौजे वडगांव–तासगाव रस्त्याकडील दाखवले येथे जाऊन पाहीले असता त्यानी बंडा गुरव यांच्या शेतात सागवाणच्या झाडाला दोरीने गळफास लावून घेवून आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले .भूपाल कांबळे हे शिरोली येथील एका पतसंस्थेत सेक्रेटरी म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते कामावरून बंद झाले होते. त्यानी गावातील अनेक खासगी सावकाराकडून कर्जही घेतले होते त्यामुळे त्याना वारंवार खासगी सावकारांचा मानसिक त्रास होत असावा यातूनच त्यानी टोकाचा निर्णय घेतला असल्याची गावात चर्चा सुरू होती . पण त्यानी सुसाईट करण्यापूर्वी होणारी मेसेजे मागे सोडला नाही पण मुलांची काळजी घे असा मेसेज पत्नीच्या मोबाईल पाठवला असल्याचे समजते .