अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर महसूल विभागाचा पंचनामा

Spread the love

टोप येथील अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर महसूल विभागाने पंचनामा करून पोलीस ठाण्याचे ताब्यात किल्ल्यासह दिले, आज सोमवारी गुन्हा नोंद होणार

 

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

 

पुलाची शिरोली टोप येथील खाणीत अवैधरित्या उत्खनन करून शिये फाट्याकडे दगड घेऊन जाणाऱ्या दोन डंपरवर महसूल विभागाने कारवाई केली. शनिवारी सायंकाळी सहा वाजता हे दोन डंपर व चाव्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ताब्यात देऊन उद्या तहसीलदारांच्या आदेशानुसार सोमवारी संबंधिताविरुद्ध गुन्हे नोंद होणार आहेत.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शिरोली मंडल अधिकारी सीमा मोरये व टोप गाव कामगार तलाठी अमोल कोथे यांना दगड खाणीत अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याचे समजले. त्यानुसार शनिवारी दुपारी दोन दगडाने भरलेले डंपरची तपासणी केली . महसूल विभागाला त्यांच्याकडे उत्खनन व वाहतूक परवाना व चलन पावती नसल्याचे निदर्शनाला आले. त्यामुळे शिरोली मंडल अधिकारी व टोप महसूल अधिकारी यांच्या पथकाने हे डंपर ताब्यात घेऊन पंचनामा करून शिरोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. विशेष म्हणजे कारवाई वेळी यातील एक डंपर नादुरुस्त होऊन बंद पडल्यावर मागील दुसऱ्या डंपर चालकाने डंपर पुढे घेण्यास नकार दिल्याचे समजते. परंतु महसूल विभागाने पोलिसांच्या सहकार्याने दोन्ही डंपर पोलीस ठाण्यात आणले. गेल्या आठवड्यात कासारवाडी हद्दीत डंपर महसूल विभागाने पकडला होता.पण त्यात दगडच नसल्याचे सांगण्यात आले.परंतु शनिवारच्या टोप येथील धाडीमध्ये कारवाई करून दोन्ही डंपर यांचे पंचनामे व डंपरच्या चाव्या पोलीस ठाण्यात जमा करून सोमवारी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनानुसार आज सोमवारी गुन्हा दाखल करणार असल्याचे मंडलिक निरीक्षक सीमा मोरये यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!