शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील काळे समाजातील विनयशील कुटुंब यशवंत काळे व प्रणव काळे यांच्या घरास काही दिवसांपूर्वी अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले होते.या आगीत त्यांचे संपूर्ण संसारोपयोगी साहित्य,कागदपत्रे,वस्तू यांसह घराचे १०० टक्के नुकसान झाले.त्यामुळे ते बेघर झाले असून,अजूनही घराचे बांधकाम सुरू आहे.या कठीण प्रसंगी काळे समाजातील प्रमुख नेते मधुकर काळे (चेअरमन) व अबु अनिल काळे यांनी पुढाकार घेत समाजातून मदतीचा ओघ सुरू केला.विविध माध्यमांतून मदत गोळा करून ती गरजू काळे कुटुंबास सुपुर्त करण्यात आली.या सामाजिक एकतेचे कौतुक सर्वत्र होत आहे.या मदतीस आणखी एक मोलाची भर पंडित बापुजी काळे यांनी दिली.समाजातील जाणकार,दानशूर व सर्वांच्या अडचणीत धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे बापुजी काळे यांनी “फुल ना फुलांची” मदत म्हणत रु. १०,०००/- चा धनादेश गरजूंना सुपूर्त केला.त्यांच्या या कृतीने समाजात सकारात्मकतेचा संदेश दिला आहे.या मदत सुपुर्त कार्यक्रमप्रसंगी मधुकर काळे, विशाल काळे,अनिल काळे,विजय काळे,दीपक काळे,अक्षय काळे,महेश काळे,राकेश काळे, पिंटू काळे व श्री.पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.या प्रकारे काळे समाजाने दाखवलेली ऐक्यभावना व मदतीची तत्परता इतरांसाठीही प्रेरणादायक ठरत आहे.प्रशासनाकडून घरकुल मंजूर झाले असून, लवकरच बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.