रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचा शिक्षक उत्कृष्टता, व्होकेशनल सर्व्हिस ॲवार्डचे शनिवारी वितरण

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

 

रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्यावतीने देण्यात येणारा टीचर एक्सलन्स ॲवार्ड (शिक्षक उत्कृष्टता पुरस्कार) विशेष क्रीडाभूषण पुरस्कार आणि व्होकेशनल सर्व्हिस ॲवार्डचे वितरण सोहळा शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता हॉटेल नमोश्री येथे होणार आहे.शिक्षकी पेशात राहून आपले वेगळेपण जपणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देणाऱ्या उत्कृष्ट गुरुजन प्रकाश तानाजी गावडे, दीपक नामदेव विटेकरी, शिवाजी शंकर कणसे, संजय देवगोंडा पाटील, सौ अंजना संजय चावरे यांना टीचर एक्सलन्स ॲवार्डने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ उज्वला विजय नातू यांना क्रीडाभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.आपल्या कर्तुत्वाने कर्तव्याबरोबरच सामाजिक भान जपणारे व्यवसायिकांना व्होकेशनल सर्व्हिस ॲवार्ड देण्यात येतो यामध्ये लोहार काम करणारे केरबा कळसप्पा लोहार, पेंटिंग व्यावसायिक महादेव सखाराम माने, सनराईज् चायनीज सेंटरच्या प्रमुख श्रीमती अर्चना अनिल जाधव यांना यावर्षीचा व्होकेशनल सर्व्हिस ॲवार्डने सन्मानित करण्यात येणार आहे. रोटरी क्लब ३१७० चे डी.जी.एन अशोक नाईक यांच्या हस्ते आणि असिस्टंट गव्हर्नर राजेंद्र माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सायंकाळी ४ वाजता हॉटेल नमोश्री येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्कारा वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष प्रा के. एम. भोसले, सचिव अमित जाधव, ट्रेझरर विराजसिंह यादव, इव्हेंट चेअरमन चंद्रकांत भाट यांनी केले आहे. यावेळी सदस्य संजय पाटील (माऊली), डॉ अरविंद माने, अतुल पाटील, संजीव पुजारी, राहुल यादव, तुकाराम पाटील (भैय्या), सुभाष पाटील, संजय शिंदे, ॲड श्रीकांत माळकर, अनिल महाजन, सचिन सावंत, श्रीकांत जाधव, आप्पालाल चिकोडे, अनिकेत जोशी, सचिन सावंत, रणजीत जगदाळे, विक्रमसिंह भोसले, सुरेश देशमुख, महेश माने, शरद उर्फ बापूसो मोरे, उल्हास पाटील, शिवाजी कोळी, डॉ. अजित बिरनाळे, यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!