पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांच्या जन्मदिनी ईद-ए-मिलादुन्नबी (पैगंबर जयंती) निमित्त के.जी.एन. फाउंडेशन व फैजाने गरीब नवाज औलिया फाउंडेशन, पुलाची शिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात हजरत मोहम्मद स.अ.व. यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषण स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये पुलाची शिरोली, वडगाव व इचलकरंजी येथील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षिसांचे वाटप करून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सलीम महात, हाजी युसूफ कच्छी, मामाजी कच्छी, वसीम पटेल, बाबासाहेब देसाई, महमंद महात, आरिफ सर्जेखान, हिदायतुल्ला पटेल, अन्सार देसाई, बबन संदेश, बाजीराव सातपुते आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी हाजी अन्वर मुजावर होते. फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाची उत्कृष्ट तयारी केली.कार्यक्रमात समाजोपयोगी उपक्रमांतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस, वही, पेन यांचे वाटप करण्यात आले. तसेच मदरशामधील लहान मुलांना फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सलाम व दुवा पठण करण्यात आले आणि सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जहांगीर मुल्लाणी यांनी केले व त्यांनीच आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.