पीडित युवतीची जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे मागणी
कोल्हापूर/ प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवून आणि कपडे घालतानाचे फोटो वायरल करेन अशी धमकी देत सांगाव येथील युवतीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पीडित युवतीने शिरोळ पोलिस ठाण्यात भूषण जितेंद्र चोकाककर याच्या विरोधात दि.26 ऑगस्ट 2025 रोजी गुन्हा दाखल केलेला आहे.संशयित आरोपी आणि त्याचे वडील यांचेकडून धमकी आणि दबाव टाकत मानसिक त्रास देत आहेत.15 दिवस झाले तरी अद्याप ही संशयित आरोपीवर कारवाई नाही त्यांच्या कारवाई करून न्याय मिळावा अशा मागणीचे निवेदन पीडित युवतीने कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पीडित युवतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 17/04/2025 ते 08/08/2025 या कालावधीत भूषण जितेंद्र चौकाककर याने माझ्यावर लग्नाचे आमिष दाखवून आणि कपडे घालतानाचे फोटो वायरल करेन अशी धमकी देत माझ्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत.त्या बाबतीत मी शिरोळ पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात दि. 26/08/2025 रोजी गुन्हा दाखल केलेला आहे.तरी अद्याप ही संशयित आरोपीस अटक करण्यात आलेली नाही.तसेच तपास अधिकारी यांनी गुन्ह्यातील फोर व्हीलर स्कोडा वाहन देखिल जप्ती केली नाही,याउलट तेच वाहन घेऊन आरोपीचे वडील पोलिस स्टेशन मध्ये अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जातात.तसेच माझ्यावर लैंगिक आत्याचार केलेत तेच फोटो संशयित आरोपी आणि त्याचे वडील माझ्या गावातील संबंधित व राजकीय लोकांना दाखवून माझी बदनामी करत माझ्यावर दबाव टाकत आहेत.तरी गुन्हयातील संशयित आरोपी भूषण जितेंद्र चोकाककर यास अटक करावी.तसेच त्याचे वडील जितेंद्र चोकाककर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि तपास अधिकारी शितल पालेकर यांनी गुन्ह्यातील वाहन जप्त करून सदर प्रकरणात लक्ष देऊन रितसर व कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा अशी विनंती पीडित युवतीने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.