नागाव व टोप येथे ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३० गणेशोत्सव मंडळावर गुन्हे दाखल

Spread the love

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे 

टोप व नागाव येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३० मंडळावर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी पोलीसानी मिरवणूक नियमानुसार १२ वाजता बंद केल्याने थोडावेळ डाॅल्बी लावण्यासाठी पोलिस व कार्यकर्ते यांच्यात हुज्जत मर्जीतल्या कार्यकर्त्याचा मंडळ असल्याने पोलिसांची संयमाची भुमिका . गुन्हे दाखल झाल्याने नागाव व टोपमधील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे डाॅल्बीच्या आवाजासारखे धाबे दणाणले , हजारो ते एक लाखाचा दंड होण्याची शक्यता . मिरवणुक बंद झाल्यावर थार कारमधील म्युझिक सिस्टीम गाणी लावून मिरवणूक पार पाडली .

 

नागाव व टोप ता हातकणंगले येथील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात डाॅल्बीच्या दणदणाटात आनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी पार पडली यावेळी नागाव व टोपमधील ३० मंडळानी लाखो रूपये खर्च करून अदिक तीव्रतेच्या आवाजाचे डाॅल्बी लावून मिरवणूकीची स्पर्धा केली पण याच स्पर्धेने त्यांच्यावर आवाजाचा उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत या आदी शिरोली , मौजे वडगाव , भुये येथील ८४ मंडळावर कारवाई केल्याचे प्रकरण ताजे असतानाच या मंडळांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवल्याचे दिसत आहे .

 

न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसानी मिरवणुका १२ वाजता बंद केल्याने पोलिसांशी कार्यकर्ते हुज्जत घात होती असाच प्रकार नागाव येथे घडला १२ ते १: ३० वाजेपर्यंत हि हुज्जत थोडा वेळ डाॅल्बी लावण्यासाठी झाला पण पोलिसानी डाॅल्बी लावू दिला नाही. मर्जीतल्या कार्यकर्त्याचा मंडळ असल्याने पोलिसांची संयमाची भुमिका घेतली पण डाॅल्बीचे मिक्सर काढून नेले पण पोलिसानी नागावमध्ये दाखवलेला संयम शिरोली पुलाची येथील मिरवणूकीत का दाखवला नाही येथे त्यानी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला होता मर्जीतील व्यक्तीचे मंडळ असल्याने शांत संयमाची भुमिका घेण्यामागचे कारण काय असू शकते याचा विचार करण्याची गरज आहे . मिरवणूक बंद केली म्हणुन याच मर्जीतील व्यक्तीने सांगली पासिंग थार कार गाडी बोलावून पोलिसांच्या नजरेसमोरून म्युझिक सिस्टीम लावून गाण्यावर नृत्य करत आपली मिरवणूक पुढे नेली . यावेळी अनेक ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता मिरवणूक या शांततेत पार पडल्या .

Leave a Comment

error: Content is protected !!