पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर मौजे वडगाव फाटा येथे थांबलेल्या रिक्षाला कारची पाठीमागून जोराची धडक दिल्याने तिघेजण जखमी झाले हा अपघात आज दुपारी ३ वाजण्यासुमार घडला.यामध्ये दोन कारचे व रिक्षाचे मोठे नुकसान झाले. जखमींची नावे समजू शकली नाहीत.धिक माहिती अशी कोल्हापूर उचगाव येथील रिक्षा चालक भाडे घेवून मिरजेकडे गेला होता चालक व प्रवासी आज दुपारी जेवणासाठी मौजे वडगाव फाट्यावरील पाटील धाब्यावर थांबले होते जेवण उरकून ते उचगावकडे जात असताना धाब्याच्या जवळ असणार्या पान टपरीवर सिगारेट घेण्यासाठी चालक रिक्षा रस्त्याच्याकडेला उभा करून गेला असता पाठीमागून आलेल्या भरधाव बलेनो कार क्रमांक एम एच १० सी एक्स ५७०४ ने रिक्षा क्रमांक एम एच ०९ इ एल २१६२ ला जोराची धडक दिल्याने रिक्षा समोर उभा असलेल्या अन्य कारवर जावून आदळली रिक्षातील प्रवासी व बलेनो कारमधील दोघे असे तिघेजण गंभीर जखमी झाले त्याना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे . यामध्ये तिनी वाहनांचे लाखोचे नुकसान झाले आहे .