शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील राजमाने परिवाराच्या वतीने कु.सेजल सुहास राजमाने (शिरोळ) हिच्या वाढदिवसानिमित्त एक आगळीवेगळी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील वृद्ध मातांना साडी वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आले.या प्रसंगी ‘आई वृद्धाश्रम’ संस्थेचे प्रमुख संजय भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी वृद्धांच्या सेवेसाठी संस्था घेत असलेले प्रयत्न, येणाऱ्या अडचणी आणि समाजातून अपेक्षित सहकार्य याविषयी मोलाची माहिती दिली. कार्यक्रमाला स्वामी समर्थ सूतगिरणीचे कार्यकारी संचालक आणि आमदार डॉ. अशोकराव माने यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने, सौ.रूपाली राजमाने, स्वरूप राजमाने या राजमाने परिवारातील सदस्यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी वृद्ध मातांशी मनमोकळा संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि भविष्यात संस्थेसाठी शक्य त्या सर्व प्रकारचे सहकार्य करू असे आश्वासन दिले.वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्वांनी कु.सेजल सुहास राजमाने हिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व तिच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली. यावेळी डॉ.दगडू माने,पंकज सुतार, महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक जाणीव ठेवून केले गेले असून, राजमाने परिवाराने उचललेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.