एकीकडे तोंड गोड तर दुसरीकडे कोळी कुटुंबियावरील हल्ल्याची चौकशी सुद्धा नाही

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

मुस्लिम धर्मियांचा आज ईद-ए-मिलाद संपूर्ण शिरोळ तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करत येत आहे.या वेळी शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रत्येक गावागावात जाऊन ईद-ए-मिलादच्या मुस्लिम धर्मीयांना शुभेच्छा देत आहेत. जिलेबी वाटप करून त्यांचे तोंड गोड करत आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आभार मानले जात आहेत.गणेश मंडळांना भेटी देऊन गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देत आहेत.मात्र कनवाड येथील अक्षय कोळी कुटुंबियावर झालेल्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या कोळी कुटुंबियांची आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी साधी चौकशी सुद्धा केली नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे.त्यामुळे डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून शिरोळ तालुक्यात असा दुजाभाव का केला जात आहे असा संतप्त सवाल समस्त सकल हिंदू समाजाच्या वतीने उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!