दुसर्यांदां बाप होणाऱ्या बापावर फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Spread the love

पाच वर्षाचा संसार आणि दुसर्या अपत्याच्या तपासणीसाठी गरोदर महिला दवाखान्यात गेली असता ति अल्पवयीन माता असल्याचे पतीवर फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

 

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

 

पाच वर्षाचा संसार आणि दुसर्या अपत्याच्या तपासणीसाठी गरोदर महिला दवाखान्यात गेली असता ति अल्पवयीन माता असल्याचे आढळली,कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयातील डाॅक्टरांनी दुसर्यांदां बाप होणाऱ्या बापावर फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.शिये ता. करवीर येथील ही घटना असून . याबाबत शिरोली पोलिसात मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.आज पतीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.लग्नाला पाच वर्षे होऊन दुसर्यांदा आईबाप होणाऱ्या दाम्पत्याने आपल्या बाळाच्या आगमनाची आस उराशी बाळगत आई आपल्या बाळाच्या तब्येतीची तपासणी करण्यासाठी कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयात गेले होते.डॉक्टरांनी आई व पोटात वाढणाऱ्या बाळाचे आरोग्य योग्य रित्या आहे ह तपासून पाहत असताना आईचे वय काय असा सवाल विचारताच अशिक्षित असणाऱ्या आईला त्याची माहिती देता आली नाही पण या आईचे वय १७ वर्षे असल्याचे डाॅक्टरांच्या लक्षात आल्यावर त्यानी समाज कल्याण विभाग, महिला दक्षता समितीव शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात कळविले आणी अल्पवयीन मातेला आपल्या पतीवरच शिरोली पोलिसाता फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. हे दाम्पत्य गोपाळ समातील असल्याने त्याचा विवाह लहान वयात होतो तो त्याच्या जात पंचायतमध्ये मान्य असल्याने ते इतर कोणत्याही आदेशाला मात नाहीत त्यानुसार ते आपल्या पंचायतीच्या निर्णयावर ठाम राहून सर्व विधी पुर्ण करतात अशा पध्दतीनेच या ही दाम्पत्याचे विधीवत रितसर विवाह पाच वर्षांपूर्वी झाला होता त्याना पहिले अपत्य कन्यारत्न आहे तर दुसऱ्यांदा हे दाम्पत्य आईबाबा होणार आहेत त्यासाठी बाळ व आपल्या तब्येची रूटींग चेक अप करण्यास गेल्यावरच हा प्रकार उघडकीस आला . पतीवर गुन्हा दाखल करण्याची वेळ पत्नीवर आली . . 

             चौकट 

याबाबत कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयातील डाॅक्टर निलिमा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला व ही माता शरीराने कमकुवत व असक्त आहे. कायद्याने लग्नासाठी वयाची अट घातली असून या कमी वयाच्या मातेच्या व बाळाच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन संबंधित खात्यांना कळविण्यात आले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!