हरोली येथील अ‍ॅड.रावसाहेब चौगुले यांचे निधन

Spread the love

हरोली येथील अ‍ॅड.रावसाहेब चौगुले यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. ते जैन धर्माचे गाढे अभ्यासक आणि निष्ठावंत साधक, अष्टम प्रतिमाधारी होते. दक्षिण भारतातील एक नामवंत विद्वान हरपला असून धर्माच्या प्रचार व प्रसाराच्या आणि सामाजिक सुधारणेच्या कार्यात ते गेली ४० वर्षे अविरतपणे कार्य करीत होते. संतशिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचेकडून त्यांनी आठवी प्रतिमा घेतली होती. आचार्यश्रींचा त्यांच्यावर विशेष स्नेह होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावाई असा परिवार आहे. बुधुवारी सकाळी साडेसात वाजता डोली यात्रा निघून आठ वाजता हरोली येथे अंत्यसंस्कार होईल.

error: Content is protected !!