पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ) बटालियन क्रमांक पाच पुणे या पथकाकडून शिरोलीगावातील प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक दोन मध्ये पंचगंगा नदीच्या महापुराचे पाणी शीरतअसते त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते या पूर परिस्थितीमध्ये संभाव्य धोक्यातून जीवित आणि वित्त हानीचे संरक्षण कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन माननीय कलेक्टर यांच्या आदेशाने इंडियन आर एफ च्या जवानांनी केले यावेळी त्यांनी बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला कृत्रिम श्वास देऊन त्याला जीवदान कसे द्यावे आगीपासून संरक्षण कसे करावे तसेच पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर घरातील उपलब्ध साधना द्वारे वाळलेल्या नारळाची रेप घागरीचे व मोकळ्या प्लास्टिकच्या बाटल्यांचे रॅप करून पुरपरिस्थितीवेळी आपला जीव कसा वाचवावा याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच सर्पदंश झालेल्याव्यक्तिवर प्राथमिक उपचार कसे करावेत तसेच पश्चिम महाराष्ट्रात विषारी असणाऱ्याच्यार सर्पाबद्दल ओळख न्याच्या खुणा तसेच सर्पदंश झाल्यानंतर त्या व्यक्तीस कशा पद्धतीची उपचार करावे याचे सखोल ज्ञान दिले यावेळी एन डी आर एफ चे टीम कमांडर एस बारीक एस सी सचिन बिडवे एस सी महेश हितपे व इतर इतर टीमचे स्वागत शिरोली सरपंच सौ पद्मजा करपे उपसरपंच विजय जाधव यांनी केले .या कार्यक्रमास माजी उपसरपंच व शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील माजी डेप्युटी सरपंच कृष्णात करपे भाजपा किसान मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य राजेश पाटील शिरोली विकास चेअरमन सतीश पाटील मंडळ अधिकारी सीमा मोरे ये ग्रामविकास अधिकारी गीता कोळी महसूल सेवक संदीप पुजारी ग्राम महसूल अधिकारी सूर्यवंशी ग्रामपंचायत प्रतिनिधी बाळासो पाटील संपत संकपाळ हेदायततुल्ला पटेल तंटामुक्ती सदस्य सदाशिव संघपाल सौ सुनीता माने ‘ कृष्णात उन्हाळे ,अशोक कोळी वीज कर्मचारी प्राथमिक आरोग्य विभाग कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारीआदी मान्यवर उपस्थित होते आभार बाजीराव पाटील यांनी मानले