आ. विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्ररोग तपासणी शिबिदास उस्फूर्त प्रतिसाद

Spread the love

जनतेच्या आरोग्य सेवेसाठी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी तत्पर : डॉ अरविंद माने

आ. विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्ररोग तपासणी शिबिदास उस्फूर्त प्रतिसाद

शिरोळ / प्रतिनिधी 

सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी तत्पर राहील असे आश्वासन क्लबचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉ.अरविंद माने यांनी नेत्ररोग तपासणी शिबिर शुभारंभ प्रसंगी दिले.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी माजी नगरसेवक डॉ. अरविंद माने यांच्या जनसंपर्क कार्यालयात रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी व डॉ अरविंद माने यांच्या माध्यमातून मोफत नेत्ररोग तपासणी व चष्म्याचे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष प्रा के. एम. भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी नेत्ररोग तपासणी शिबिरासाठी विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटलमधीलआलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ. सारिका अरविंद माने, शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी. आर. पाटील, रोटरी क्लब ऑफ शिरोळ सिटीचे सचिव अमित जाधव, संस्थापक अध्यक्ष संजय पाटील (माऊली), माजी अध्यक्ष तुकाराम पाटील (भैय्या), संजय तु. शिंदे, सदस्य ॲड श्रीकांत माळकर, सुभाष पाटील, संजय रा. शिंदे, चंद्रकांत भाट, अनिल महाजन,सचिन सावंत, अमर कोगे, दादासो आवळे, सुशील पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी परिसरातील शेकडो गरजूंनी या नेत्ररोग तपासणी शिबिराचा लाभ घेतला. आवश्यक असणाऱ्या गरजूंना नंबरच्या चष्म्याचे मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!