पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
चोकाक ता. हातकणंगले येथील मोहरम हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतिक मोहरम धार्मिक वातावरणात पीर पंजे भेटीचा सोहळा उत्साहात अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला मोहरम हे हिंदू मुस्लिम एक्याची प्रतीक आहे धार्मिक वातावरणात मोहरमचा नव्वा दिवस संपन्न झाला शनिवारी मध्य रात्री खत्तलरात्र निमित्त खाई फोडण्याचा पारंपरिक धार्मिक विधी पहाण्यासाठी हिंदू – मुस्लिम धर्मीयांनी मोठी गर्दी केली होती.हातकणंगले तालुक्यातील चोकाक गावांमध्ये एकही मुस्लिम नसल्याने चोकाक गावातील सर्व हिंदू – मुस्लिम एक्याचे प्रतिक असलेला मोहरम अतिशय चांगल्या प्रकारे व उत्साहामध्ये साजरा केला जातो त्यामध्ये मराठा,माळी,लिंगायत, कुंभार,जैन,चर्मकार,हरिजन,मातंग,समाज हे सर्व बंधू भावाने एकत्र येऊन मोहरम उत्सव साजरा करतात सालाबादप्रमाणे याही वर्षी करबलाचा खेळ खेळला आहे.करबला खेळ झाल्यानंतर खाई खेळणारे सर्व भक्त अंघोळीला जातात व अंघोळ करुन आल्यानंतर खाई फोडण्याचा कार्यक्रम केला जातो व थोड्या वेळात खाई खळण्याचा कार्यक्रम चालू होतो.त्यानंतर पंजे बाहेर भेटीला जाण्याचा कार्यक्रम चालू होतो यातील प्रथम मानाचा पंजा हजरत हुसेन साहेब,त्यानंतर मानाचा गैबी साहेब,राजेबागे स्वार साहेब,नाले हैदर, इमाम हूसेन,बेबी फातिमा अशा रीतीने सार्वजनिक दर्गा तालीम मंडळ चोकाक या ठिकाणी मोहरम उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. मोहरमच्या नवव्या दिवशी दिवसभर अबालवृद्ध महिला भाविकांनी पिर पंजा दर्शनासाठी गर्दी केली होती.मलीदा उद साखर अर्पण करण्यात आला बालचमूनी अवर्जुन रंगीबेरंगी सैली अट्टी बांधली अनेकांनी पीर पजांना भरजरी वस्त्रे अर्पण केली यामुळे पीर पंजा प्रतिष्ठापना केलेल्या परिसरात उद-धुपाचा घमघमाट पसरला होता.हिंदू मुस्लिम ऐकायचे प्रतीक असलेल्या मोहरम चे नियोजन सार्वजनिक दर्गा तालीम मंडळचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले होते.