शिरोळ महसूल मंडलात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर यशस्वी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान 2025 अंतर्गत शिरोळ महसूल मंडलामार्फत विविध दाखले वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळ तालुक्याच्या निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे, नूतन मंडळ अधिकारी विनायक आरगे यांची उपस्थिती होती.यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील बोलताना म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती व सेवा नागरिकांना मिळत आहे.ग्रामस्थांनी या सुविधांचा लाभ घ्यावा.या शिबिरात दुबार नवीन शिधापत्रिका, रहिवासी दाखले (डोमेसाईल), उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, ईडब्ल्यूएस, नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट, जिवंत 7/12 फेरफार, 7/12 उतारे, पीएम किसान केवायसी, ई-श्रम कार्ड, फार्मर आयडी नोंदणी आदी विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य सुविधा, ॲग्रीस्टॅक, अ.पा.क. नोंदी, लक्ष्मी मुक्ती योजना, ई-पिक पाहणी, ग्रामपंचायतकडील किसान प्रमाणपत्र याबाबत माहिती देण्यात आली.शिबिरात शिरोळ महसूल मंडळातील शिरोळ, आगर, शिरटी, अर्जुनवाड, कनवाड, हसूर, कुटवाड व घालवाड या गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ग्राम महसूल अधिकारी व ग्राम सेवकांनी योग्य नियोजन व कार्यवाही करून कार्यक्रम यशस्वी केला. ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.शिबिराच्या प्रारंभी मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले,तर कार्यक्रमाचे आभार संभाजी घाटगे यांनी मानले.

error: Content is protected !!