हद्दवाढीविरोधात पाण्याच्या टाकीवर चढून शिरोलीत शोले स्टाईल आंदोलन

Spread the love

 

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात प्रस्तावित असलेल्या हद्दवाढीमध्ये पुलाची शिरोली या गावचा समावेश न करता, शिरोली गावची भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन शिरोलीसाठी स्वतंत्र नगरपरिषद मंजूर करावी या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शौले स्टाईल आंदोलन करत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून गावबंद करण्यात आले .यावेळी टाकीवर चढून आंदोलन करत्याना शिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले .

 

कोल्हापूर हद्दवाढीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. या हद्दवाढीविरोधात हद्दवाढीत येणार गावात आंदोलन सुरू केले आहे. शिरोली पुलाची येथील ग्रामस्थांनी हद्दवाढ होऊ नये यासाठी एक अनोखे आंदोलन आज केले. शिरोली येथील पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीवर चढून हे शोले स्टाईल आंदोलन केले आहे.. येथील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत असणार्या गावांना नगर पालिका मुलभूत सुविधा उपलब्ध करून देत नाही. तर हद्दवाढ करून समाविष्ट केलेल्या गावांना काय सुविधा देणार ..? असा प्रश्न उपस्थित करून ग्रामपंचायत कडून आम्हाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महानगर पालिकेकडून फक्त उत्पन्न वाढविण्यासाठी होणारी हद्दवाढ ही आमच्या ग्रामीण जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे या हद्दवाढीविरोधात आम्ही तिव्र आंदोलन सुरू करू असा इशारा ही या पाण्याचा टाकीवर चढलेल्या कार्यकर्त्यांनी दिला आहे… तर शिरोली गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद व्हावी अशी मागणी यापूर्वी केलेली आहे .

हद्दवाढ न करता शिरोलीसाठी नगरपरिषदेची मागणी केलेली आहे या मागणीचा शासनाने विचार करावा असा सूर आंदोलनात सहभागी कार्यकर्ते करीत आहेत.

 

यावेळी ग्रामपंचायतीसमोर हद्दवाढीविरोधात तिव्र निषेध व्यक्त केला यावेळी उपसरपंच बाजीराव पाटील , कृष्णात करपे , दिपक यादव , प्रकाश कौंदाडे , राजेश पाटील , सतीश पाटील,सागर कौंदाडे , सतीश पाटील , आरिफ सर्जे खान, महादेव सुतार ,हिदायत देसाई दीपक यादव, संदेश शिंदे, संजय पाटील, बाळासो पाटील, संपत संकपाळ निलेश शिंदे , जोतीराम पोर्लेकर , राहूल खवरे , गणेश यादव , श्रीकांत कदम , आदिनाथ पाटील, गणेश खोचीकर, विशाल खोचीकर, विकी पाटील, शुभम जाधव, राहुल मोरे, सागर पाटील, शुभम पाटील, लखन घाडगे, श्रीपाद रंगापुरे आदिसह उपस्थित होते .

error: Content is protected !!