राजर्षी शाहू पॅनेलची एकहाती सत्ता, सर्व १५ उमेदवार विजयी तर ५ बिनविरोध

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी 

 

कोल्हापूर जिल्हा कोतवाल सेवक पतसंस्थेच्या सन 2025-2030 या पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू पॅनेलने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत पॅनेलचे सर्व 15 उमेदवार विजयी झाले असून, त्यापैकी 5 उमेदवार बिनविरोध तर उर्वरित 10 उमेदवारांनी मतांच्या लढतीत बाजी मारली.बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये विविध प्रवर्गातील प्रतिनिधित्व दिसून आले.भटक्या विमुक्त जाती,जमाती/विशेष मागास प्रवर्गातून संदीप धोंडीराम पुजारी शिरोली,ता. हातकणंगले),महिला राखीव गटातून सौ.कमल बाबासो पाटील (आसुर्ले,ता.पन्हाळा) व सौ. सुनिता ईश्वरा डवरी (कंथेवाडी,ता.राधानगरी), इतर मागास प्रवर्गातून आनंदा नामदेव गुरव (कौलव,ता.राधानगरी),तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून बाजीराव महिपती कांबळे (नांदणी,ता.शिरोळ) यांची बिनविरोध निवड झाली.इतर 10 जागांवर झालेल्या मतदान प्रक्रियेत राजर्षी शाहू पॅनेलचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.त्यामध्ये पांडुरंग बाळकृष्ण बरकाळे (गिजवणे,ता.गडहिंग्लज) यांनी सर्वाधिक 173 मते मिळवून आघाडी घेतली.त्यांच्यानंतर विजय मारुती शिंदे (वडकशिवाले,ता.आजरा) 164 मते,गणेश पांडुरंग अत्तरकर (वाडीचरण, ता. शाहूवाडी) – 160 मते, बाबासो दत्तात्रय पाटील (जठारवाडी, ता. करवीर) 159 मते, सुरेश बाजीराव दिंडे (बहिरेश्वर, ता. करवीर) 156 मते, यशवंत आनंदा मोरे (निगवे दुमाला, ता. करवीर) – 154 मते, पांडुरंग शंकर इंदूलकर (महालवाडी, ता. भुदरगड) 153 मते, हरिभाऊ दत्तात्रय पाटील (म्हाकवे, ता. कागल) 151 मते, दीपक दिनकर खांडेकर (वळीवडे, ता. करवीर) 149 मते, व अतुल श्रीपती जगताप (देवठाणे, ता. पन्हाळा) 146 मते, अशा क्रमाने यश संपादन केले.या विजयानंतर राजश्री शाहू पॅनेलच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून,संस्थेच्या पुढील कारभारात विकासाभिमुख आणि पारदर्शक कामकाजाचे आश्वासन देण्यात आले आहे.

error: Content is protected !!