पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली औद्योगिक वसाहतीतील चौगुले इंडस्ट्रीज प्रा. लि. या ट्रॅव्हल्स बसच्या वर्कशॉपमध्ये शाॅर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत बसच्या नव्या जुन्या सिट जळून खाक झाल्या. तात्काळ आग विझविण्यात अग्निशमन दलास यश आलेने पुढील अनर्थ टळला. या आगीत सुमारे एक लाख रुपये किंमतीची साहित्य जळाले.
शिरोली औद्योगिक वसाहतीतील चौगुले इंडस्ट्रीज प्रा. लि. या एसएमएल इसुझू या ट्रॅव्हल्स बसच्या वर्कशॉप असून या कंपनीत आज सकाळी नेहमीप्रमाणे कामगार व कर्मचारी कामावर रुजू झाले. साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वेल्डिंग चे काम सुरू असताना अचानक शाॅटसर्किट झाल्याने जवळपास असलेल्या बसच्या जुन्या काँयर फोम या सीटला आग लागली . थोड्या वेळात आग भडकली. जवळपास असलेल्या जुन्या कागदपत्रांनाही आग लागली. या लागलेल्या आगीत बसच्या नव्या जुन्या सिट जळून खाक झाल्या. तात्काळ आग वाजविण्यात यश आलेने पुढील अनर्थ टळला. या आगीत सुमारे एक लाख रुपये किंमतीची साहित्य जळाले. आग आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापूर येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी व कंपनीतील कर्मचाऱ्यांनी मोलाचे काम केले..