पंचगंगेला जलपर्णीचा विळखा,शिरोळ बंधाऱ्याला धोका पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष – शहाजी गावडे 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ तालुक्यातील पश्चिमेच्या भागातील अनेक गावांना वरदायी ठरलेला शिरोळ बंधाऱ्याचे अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे. याकडे पाटबंधारे विभागासह खासदार आमदार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.यामुळे पंचगंगा नदी काठावरील गावातील ग्रामस्थांकडून शासनाच्या कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा पडल्याने या बंधार्‍याला मोठा धोका निर्माण झाला आहे.जलपर्णी हटवण्याची मागणी करूनही याकडे पाटबंधारे विभागाने हातावर घडी तोंडावर बोट ठेवले अशी संतप्त प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे शिरोळ शहर अध्यक्ष शहाजी गावडे यांनी आज रविवार दिनांक 25 मे रोजी सायंकाळी साडे पाच वाजता नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे पंचगंगा नदी पात्रात पाण्याची वाढ होऊन शिरोळ बंधारा रविवारी पहाटे पाण्याखाली गेला आहे.मात्र यापूर्वीच बंधाऱ्याला जलपर्णीचा मोठा विळखा पडला आहे.त्यामुळे बंधार्‍याला मोठा धोका निर्माण झाला आहे.या बंधाऱ्याची यापूर्वीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.बंधारा डागडुजीचे केलेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाण्याच्या प्रवाहात बांधण्यात आलेले पिलर वाहून गेले.तसेच बंधार्‍यावरती मोठमोठे खड्डे पडले आहेत. दुरुस्तीसाठी वापरण्यात आलेला निधी निकृष्ट कामामुळे पाण्यात गेला आहे.या कामाची चौकशी करण्याची मागणी जनतेने केली होती.मात्र संबंधित विभागाकडून या मागणीलाच वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.गेल्या अनेक वर्षासापासून शिरोळ बंधार्‍याची दुरुस्ती करावी अशी मागणी वारंवार पंचगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांसह जनतेने केली आहे.या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.त्यामुळे या बंधाऱ्याच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण झाला आहे.पाण्याच्या प्रवाहांबरोबर आलेल्या जलपर्णीचा विळखा या बंधाऱ्याला पडला आहे. जलपर्णीचा विळखा या बंधार्‍याला धोका पोहोचवत आहे.याकडे पाटबंधारे विभागाने हातावर घडी,तोंडावर बोट ठेवले आहे.पंचगंगा नदीपात्रातील जलपर्णी हटवण्याची मागणी गावडे यांनी केली आहे.

error: Content is protected !!