पुलाची शिरोलीत काशिलिंग बिरदेव जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

 

पुलाची शिरोली येथील शिरोली गावचे ग्रामदैवत भक्तांच्या हाकेला धावणारा काशिलिंग बिरदेव यांचा जन्मोत्सव आज मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.सायंकाळी पुलाची शिरोली येथील लखन माळी त्यांच्या घरी पाळणा फुलांच्या माळा लावून सजवण्यात आला.त्यानंतर पाळणा धनगर समाजातील पुजारी तेथे येवून ढोल कैताळाच्या निनादात भंडाऱ्याची उधळण करत पाळणा देव माळी येथे आणून तेथे धनगर समाजातील सर्व पुजारी मानकरी यांनी आरती करून पाळणा ढोल कैताळाच्या निनादात काशिलिंग बिरदेव मंदिरामध्ये आणण्यात आला.आज पहाटे पाच वाजता काशिलिंग बिरदेव यांना महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती करण्यात आली.सकाळी सात वाजता समाजाचे पुजारी गाव कामगार पाटील गावातील सर्व मानकरी सर्व धनगर समाज गावकरी या सर्वांनी काशिलिंग बिरदेवास पाळण्यामध्ये घालून पाळणा गीते महिलानी गायली त्यानंतर सुटवड्याचे वाटण्याचा कार्यक्रम झालाा.त्यानंतर सकाळी अकरा वाजल्यापासून प्रसाद वाटपा करण्यात आला रात्री नऊ नंतर धनगरी ओव्यांचा कार्यक्रम व जागर होणार आहे.

error: Content is protected !!