महापूरावर उपाययोजना सुचवण्यासाठी शिरोळ तालुक्यात स्वतंत्र बैठक घ्या – आंदोलन अंकुश

Spread the love

 

शिरोळ / प्रतिनिधी 

 

दरवर्षी महापुराचा सर्वात मोठा फटका शिरोळ तालुक्याला बसतो या ठिकाणी महापूर ओसरल्यानंतर सुद्धा पंधरा दिवस पाणी साठुन राहते त्यामुळे इथली पिके,व्यवसाय जनजीवन विस्कळीत होतं.महापूर येऊन जातो पण महापुराचे पाणी साठुन जे नुकसान होतं त्याला 2005 नंतर इथे झालेली विकास काम,पूल व त्यांचे भराव,नदीपात्रातील अडथळे,साठलेला गाळ,मुजलेले नाले,या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत.त्यामध्ये तांत्रिक बदल केला असता पुराचं गांभीर्य कमी करू शकतो. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील विविध भागातील वरील सर्व गोष्टींच्या वर विचार करून प्रस्तावित विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यासाठी शिरोळ तालुक्याला वेगळी बैठक घ्यावी अशी विनंती जिल्हाधिकारीसो अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील,भगवान कोईगडे,महेश जाधव,सुनील दिक्षित,संपत मोडके आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!