तर….भारत – पाक युद्धात सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढू,सैनिक टाकळीच्या माजी सैनिकांच्या प्रतिक्रिया

Spread the love

तर….भारत पाक युद्धात सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढू,सैनिक टाकळीच्या माजी सैनिकांच्या प्रतिक्रिया

काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला होता.दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तान विरोधात देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.या हल्ल्याचा भारतीय सैन्य दलानं बदला घ्यावा अशी देशभरात जनभावना होती.मंगळवारी मध्यरात्री भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून थेट पाकिस्तानात घुसत ९ दहशतवादी तळ उध्वस्त केले.या हवाई हल्ल्यानंतर देशभरात सर्वत्र जल्लोष साजरा करत भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले जात आहे.शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील माजी सैनिकांनी भारतीय सैनिकांचं अभिनंदन करत “गरज पडल्यास सीमेवर जाऊन भारतीय सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून देशासाठी लढू अशा भावना ऑडनरी सुभेदार मेजर आत्माराम पाटील,ऑडनरी कॅप्टन प्रकाश खोत,हवालदार जनार्दन पाटील,हवालदार दादासाहेब पाटील यांनी व्यक्त केल्या.यापुढंही दहशतवादी कारवाई हल्ले केल्यास भारताकडून मुंह तोड जवाब मिळेल इशारा ही माजी सैनिकांनी दिला आहे.

error: Content is protected !!