दूधगंगा नदी कोरडी पडल्याने ९ गावचा पाणीपुरवठा ठप्प,कर्नाटकने सहकार्याची भूमिका घ्यावी – बबन चौगुले 

Spread the love
दत्तवाड / प्रतिनिधी 

शिरोळ तालुक्यातील दूधगंगा नदी पात्र गेली दोन दिवसापासून कोरडे टाक पडले असून या दूधगंगा काठावर असणाऱ्या तेरवाड,हेरवाड,अब्दुल लाट, शिरदवाड,घोसरवाड,दत्तवाड,नवे दानवाड,जुने दानवाड या गावचा पाणीपुरवठा दोन दिवसापासून बंद पडला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.कर्नाटकातील कारदगा येथे बंधाऱ्यातून दूधगंगा नदी पात्रात पाणी सोडावे यासाठी कर्नाटक सरकारने सहकार्य करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया दत्तवाडचे नागरिक बबनराव चौगुले यांनी बोलताना दिले आहे.चौगुले पुढे म्हणाले काळमवाडी धरणातून दूधगंगा नदी पात्रात पाणी सोडले जाते.मात्र कर्नाटक हद्दीत असणारा कारदगा येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यात पाणी अडवले आहे.

 

त्यामुळे महाराष्ट्रातील दूधगंगा नदी काठावरील नऊ गावचा पाणीपुरवठा बंद पडला आहे.तरी कर्नाटक सरकारने सहकार्याची भूमिका घेऊन कारदगा बंधाऱ्यातून दूधगंगा नदी पात्रात पाणी सोडावे अशी मागणी ही चौगुले यांनी यावेळी केले आहे.

error: Content is protected !!