तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर कोथळी नंदिवाले समाजाचे उपोषण मागे

Spread the love

कोथळीच्या नंदीवाले वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या गटाची होणार ९ मे रोजी मोजणी

कोथळी / प्रतिनिधी 
कोथळी येथील मगदूम मळा ते नंदगाव वसाहत या नंदीवाले वसाहतीकडे जाणाऱ्या शेती रस्ता खुला करून तो रहदारीस योग्य करावा या मागणीसाठी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी नंदीवाले समाजाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार होते.मात्र उपोषणापूर्वी तहसील कार्यालयात तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी बोलाविलेल्या बैठकीत चर्चेअंती ९ मे रोजी मोजणी करून हद्द निश्चित करण्यात येईल.तशा नोटीसा संबंधित शेतकऱ्यांना २९ एप्रिल रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख शिरोळ यांच्यावतीने देण्यात आल्याचे सांगितले.तसे लेखी आश्वासन दिल्याने गुरुवार १ मे रोजी होणारे उपोषण नंदीवाले समाजाने स्थगित केले.कार्यालयात झालेल्या बैठकीत तहसीलदार हेळकर यांनी प्रथमता मोजणी करून हद्द नक्की झाल्यानंतर रस्ता किती फुटाचा आहे त्यानुसार अतिक्रमण काढण्यात येईल यावेळी शेतकऱ्यांचा विरोध झाल्यास प्रसंगी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढून रस्त्याचा मार्ग मोकळा करण्यात येईल असे आश्वासन दिले.त्याचबरोबर रस्त्याच्या मजबुती करण्यासाठी शासन स्तरावर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी नंदीवाले समाजाला दिली.महेश  नंदीवाले म्हणाले,तहसीलदार यांनी आम्हाला अतिक्रमण काढून रस्त्याची हद्द निश्चित करण्याबरोबरच रस्ता मजबुतीकरण करण्याची आम्हाला आश्वासन दिले आहे.त्यांनी उपोषण थांबवा रस्त्याचं माझं मी बघतो असे सांगितल्याने हे उपोषण स्थगित करत असल्याचे सांगितले.प्रकाश नंदीवाले म्हणाले या रस्त्यासाठी आम्ही यापूर्वी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला.नंतर लोकप्रतिनिधीनी व तहसीलदार यांनी आम्हाला आश्वासन दिले पण रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला नाही.आज पुन्हा आम्हाला लेखी आश्वासन मिळाले आहे.त्यामुळे १ मे रोजी तहसील कार्यालयासमोर होणारे आमरण उपोषण तुर्त मागे घेत आहोत.रस्त्याचा प्रश्न निकाली न झाल्यास हे आंदोलन पुढे सुरूच राहणार आहे.या बैठकीला गटविकास अधिकारी नारायण घोलप,जयसिंगपूर मंडल अधिकारी राहुल कोळी व नंदीवाले समाजातील यल्लाप्पा नंदीवाले,रामा नंदीवाले,नंदीवाले, माणिक नंदीवाले,लव नंदीवाले,बाजीराव नंदीवाले,राकेश नंदीवाले,संतोष नंदीवाले, पांडुरंग नंदीवाले,मानेश्वर नंदीवाले आदींसह समाजातील प्रमुख उपस्थित होते.
error: Content is protected !!