शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करूया : खा . धैर्यशील माने

Spread the love

हातकणंगलेत दोन हजार लाभार्थ्यांना मंजुर आदेश पत्र वाठप

हातकणंगले / प्रतिनीधी 

शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत , तरच खऱ्या अर्थाने सर्वसामानन्य गरजु व्यक्ती पर्यंत जात येईल व त्याला योजनेचा लाभ मिळेल असे मत खा.धैर्यशील माने यांनी व्यक्त केले ते हातकणंगले येथे आयोजीत तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या दोन हाजार लाभार्थ्यांना मंजुर आदेश पत्र वाठप कार्यक्रमात बोलत होते.पुढे बोलताना खा . माने म्हणाले हातकणंगले संजय गांधी निराधार समितीचे कार्य कौतुकास्पद असुन योग्य लाभार्थ्यांला लाभ मिळाला पाहिजे यासाठी सर्वच समिती सदस्य प्रयत्न करत आहेत पण लाभार्थी सक्षम होण्यासाठी सुद्धा त्यांनी त्यांच योगदान द्याव असही ते म्हणाले . तसेच योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्याचे अवहान करूण लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले .

यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांनी कमीटीच्या कामाचा आढावा घेताना आता पर्यंत बावीस हाजार लाभार्थ्यांना निराधार अनुदान मंजुर केले असुन , तालुक्यातील पात्र व्यक्ती लाभापासुन वंचीत राहणार नाही यासाठी गावपातळीपासुन प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले
कार्यक्रमास तहसीलदार सुशील बेल्हेकर , अरुण पाटील , संभाजी पवार .यासीन मुजावर, रमेश घोरपडे, शकील जमादार यांच्यासह समितीचे सदस्य संजय देसाई, दौलत पाटील,संदेश भोसले, अमोल गावडे,बाळासाहेब गायकवाड ,सौ. कविता सूर्यवंशी, सुदाम इंगवले, तानाजी ढाले, , संजय पुजारी आभार नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी मानले.

error: Content is protected !!