जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील डॉक्टर शांता पाटील यांच्या रुग्णालयात गर्भलिंग चाचणी होत असल्याचा आरोप करत सोनोग्राफी सेंटरची तपासणी करून मशीन सील केले आहे. मात्र तपासणी बाबत कोणताही पुरावा मिळाला नाही तरी ही सोनोग्राफी मशीन सील करून आपल्यावर झालेल्या अन्यायविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी आपण आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.गर्भनिदान चाचणी प्रकरणी जयसिंगपुरातील “त्या” डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करावी अन्यथा 21 एप्रिल पासून कोल्हापूर सीपीआर रुग्णालयासमोर उपोषण ला बसणार असल्याची माहिती डॉक्टर शांता पाटील यांनी आज बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता बोलताना दिली आहे.यावेळी डॉक्टर शांता पाटील म्हणाल्या आळते येथील एका महिलेची गर्भलिंग चाचणी व गर्भपात करताना मृत्यू झाल्या प्रकरणी कर्नाटकातील महालिंगपूर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.संशयित सात आरोपी पैकी सहा जणांवर कारवाई केली आहे.सातवा संशयित जयसिंगपूरातील एक पुरुष डॉक्टर असताना केवळ निनावी तक्रारीच्या अनुषंगाने माझ्या रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात आली.दरम्यान गर्भलिंग चाचणी करणारी संबंधीत महिला रुग्णालयात आला असल्याचे एकही पुरावा मिळाले नाही घटना घडवून वर्षे झाले तरी सातव्या संशयित आरोपीवर कारवाई होत नाही.त्यामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायविरोधात उपोषणास बसणार असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले आहे.