शिरोळ / प्रतिनिधी
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.पद्माराजे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्सची विद्यार्थिनी कु.शांभवी श्रीकांत माळकर हिने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त बौद्ध विकास मंडळ, आरवडे ता.तासगाव ,जिल्हा सांगली यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत ज्युनिअर गटात प्रथम क्रमांक पटकावला. तिला मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.
तर भगवान महावीर स्वामींच्या २६२४ व्या जन्मकल्याणक निमित्त समस्त जैन समाज (सर्व पंथीय ) सांगली यांच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सीनिअर गटात कु. प्रज्ञा श्रीकांत माळकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक , ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
वरील स्पर्धेत कु. शांभवी माळकर हिने ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व आधुनिक भारत ” या विषयावर तर कु. प्रज्ञा माळकर हिने ” जैन धर्मातील पर्युषण पर्व – अध्यात्मिक उन्नतीची सुवर्णसंधी ” या विषयावर आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले. कु. प्रज्ञा व शांभवी यांना त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.