ट्रेलरची दुचाकीला धडकेत टोप येथील तरूण ठार

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

समोरून येणाऱ्या दुचाकीस ट्रेलरची धडक बसून टोप ता हातकणंगले येथील तरूण जागीच ठार झाला हा अपघात आज दुपारी साडेतीन वाजण्यासुमार शिये फाटा ते कसबा बावड रोडवर झाला . मयत तरूणाचे नाव उत्कर्ष सचिन चौगुले ( पाटील) ( वय १८ ) असे असून तो क्लासला जात असताना हा अपघात झाला .

पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार उत्कर्ष हा १२ वीला असून तो आज दुपारी साडेतीन वाजण्यासुमार कसबा बावड येथे क्लासला जात असताना तो उषा नर्सरीजवळ आला असता कसबा बावड्याकडून शिये फाटा मार्गे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने समोरासमोर उत्कर्ष याच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने उत्कर्ष हा रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या खड्यात उडून पडल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादर्म्यान त्याचा मृत्यू झाला .ट्रेलर चालकाने अपघात करून घटनास्थळावरून पळ काढत काही अंतरावर असणाऱ्या शिये फाटा येथील हाॅटेल दुर्गामाता जवळ ट्रेलर लावून पोबारा केला पण घटनेची माहिती नागरिकांना कळताच त्यानी ट्रेलरची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला . या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरा झाली आहे .

error: Content is protected !!