पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील फैजन्य गरीब नवाज अवलिया फाउंडेशन गेली चार वर्षापासून कार्यरत आहे.या फाउंडेशनच्या माध्यमातून पूर परिस्थिती कोरोना काळामध्ये या फाउंडेशनने उल्लेखनीय कार्य केले आहे व आज अखरीस कार्य करत आहे.रमजान ईद चे निमित्त साधत मुस्लिम हिंदू समाजाच्या गरीब गरजू विधवा महिलांना या फाउंडेशन तर्फे १५० महिलांना संसार उपयोगी किटचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनवर मुजावर हे होते.यावेळी उपाध्यक्ष इस्माईल मुल्ला बालीचंद सनदे,फाउंडेशनचे सेक्रेटरी जहांगीर मुल्ला,प्रमुख उपस्थिती माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौदाडे,माजी ग्रामपंचायत सदस्य उद्योजक सलीम महात,ग्रामपंचायत सदस्य महंमद महात, बाबासाहेब देसाई,अन्सार देसाई उपस्थित मान्यवरांचे व गरीब गरजू विधवा महिलांचे आभार जहांगीर मुल्ला यांनी मांडले व कार्यक्रमाची सांगता झाली.