हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक गुरुवार दि.13 मार्च रोजी समितीचे अध्यक्ष झाकीरहुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे पार पडली. बैठकी पूर्वी आमदार अशोकराव माने यांनी संजय गांधी समितीच्या कार्याचा आढावा घेतला.व लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत माहिती शासनस्तरावर सोडवणूक करण्याची ग्वाही दिली. यावेळी समितीच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला.सदर बैठकीत प्राप्त झालेल्या एकूण 1041 प्रस्तावापैकी 1026 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तसेच 15 प्रस्तावात त्रुटी असून सदर प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून तलाठ्यांमार्फत तात्काळ पुढील मीटिंग मध्ये सादर करण्याचे ठरले. यावेळी तहसीलदार तथा समिती सचिव श्री. सुशीलकुमार बेल्हेकर, नायब तहसीलदार श्री. संदीप चव्हाण,समिती सदस्य सर्वश्री बाळासाहेब गायकवाड, अमोल गावडे, महेंद्र शिंदे,दौलत पाटील,सुदाम इंगवले, संदेश भोसले, तानाजी ढाले, संजय देसाई, सौ. कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते.